व्हेनेझुएला देशातील शहरी महागाईत जगण्याची धडपड करत तयार झालेली, चमत्कारिक, फिल्मी, जगातील सर्वात उंच सर्जनशील झोपडपट्टीची एक अनोखी कहाणी,
आपण फक्त मुंबईतील झोपडपट्टी पाहिली आहे, झोपडपट्टीतील गुन्हेगारी पाहिली आहे, वाचली आहे, पण हीच मुंबईतील झोपडपट्टी भारताच्या आर्थिक राजधानीत मोठ्ठा हातभार लावते, भंगारचा धंदा असो, किंवा कापड उद्द्योग, मशीनरी असो किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असोत, भारताच्या आर्थिक विकासात, दरवाढ आटोक्यात ठेवण्यात बऱ्यापैकी चांगला हात आहे, कुर्ला मार्केट जर पाहिल तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, गाडी चोरीला गेली तर सगळे पार्ट वेगळे होऊन तिथे विकायला आलेले असतात अशी म्हण आहे! गाड्यांचे पूर्ण इंजिन विकत मिळते, मग कोणतीही गाडी असो, मारुती, टाटा पासून ते मर्सिडिस ऑडी पर्यंत, सगळ्या गाड्यांचे पार्ट मिळतात, गुन्हेगारीच्या बाबतीतही सर्व शहरातील झोपडपट्ट्या तितक्याच प्रसिद्ध आहेत, आणि तिथे राहणाऱ्या लोकांमद्धे भाईचारा आणि प्रेमही तितकेच असते, एकदुसऱ्यासाठी एकजुटीने सर्वजण जमा होतात.
पण मी ज्या झोपड्पट्टीची गोष्ट सांगणार आहे ती वेगळीच आहे, व्हेनेझुएला देशातील कराकस राजधानीतील. जिथे जगातील सर्वात उंच ४५ माजली झोपडपट्टी आहे! आश्चर्य वाटलं ना ? हे शहर अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे १९९३ मधील बँकिंग संकट, त्यानंतर ह्या देशाने २०१८ मद्धे महागाईचा जगातील सर्वात उच्चनक गाटला होता ६५,३७४%,
व्हेनेझुएला देशाची इकूण लोकसंख्या २९ कोटी च्या आसपास आहे, इसाई हा तेथील मोठा धर्म, ९२% लोक इसाई आहेत, स्पॅनिश तेथील स्थानिक भाषा आहे, त्याचबरोबर चिनी लोकही बऱ्याच प्रमाणात आहेत, व्हेनेझुएला देशाचा २०२२ चा जीडीपी $८२.१४५ बिलियन आहे, जी भारताच्या बरोबरीने खूपच कमी आहे, देश जरी छोटा असला तरी अमेरिका जवळ असल्यामुळे तिथे अमेरिकन डॉलर चा जास्त प्रभाव आहे, देशाचे चलन "बोलीवर" आहे, पण अनऑफिशिअल अमेरिकन डॉलर पण चालते,
जगातील सर्वात उंच झोपडपट्टी कशी झाली ही कहाणी सुद्धा चित्रपटासारखी आहे, शेअर मार्केट इन्व्हेस्टर शी जोडलेली आहे, म्हणून मला ती खूप भावली, मी ठरवलं, कि ती आपण मराठी वाचकांपुढे आणावी, मला लेखकांसारखे लिहीता येत नाही पण साध्या भाषेत सांगतो.
१९७० ते १९९० च्या दशकात अमेरिकेने आर्थिक सुधारणेत सर्वात उंच शिखर गाठले होते, तेव्हा अमेरिकेत महागाई कमी होती सर्वांचे उत्पन्न खुप चांगले होते, नोकऱ्याही खूप होत्या, शेअर मार्केट मद्धे तेजी होती, त्याच वेळेस दक्षिण अमेरिका खंडात पण अमेरिकेतून खूप पैसे येत होते, व्हेनेझुएला देशातील एक हुशार शेअर ट्रेडर आणि इन्व्हेस्टर डेव्हिड ब्रीलएम्बुर्ग (David Brillembourg) याने खूप पैसे कमवले होते, देशाची आर्थिक तसेच राजधानी कराकस मधील श्रीमंत व्यक्ती होता, त्याला लोक किंग डेव्हिड म्हणायचे, त्याने आपल्या नावाने एक मोठा ट्रेड टॉवर बांधायचा ठरवला, तसे आपल्याकडे अनेक टॉवर आहेत. देशातील राजकारणातही त्याला मानणारा मोठा वर्ग होता, मोठ्या बँकांना आणि काही इन्व्हेस्टर ना घेऊन त्यांनी मोठा प्रोजेक्ट हाती घेतला, शहरातील, देशातील सर्वात मोठी ४५ माजली इमारत बांधली पण ती पूर्ण होण्या आधीच १९९३ साली त्याचा मृत्यू झाला,
आणि एकच सर्वांची धांदड उडाली, कारण देश सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात होता, त्यात सर्व मोठ्या बँकांनी ट्रेड टॉवर प्रोजेक्ट साठी पैसे गुंतवले होते, कारण ती इमारत शहराच्या मध्यभागी होती, सरकारला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण सगळा डाव फसला, बँका इन्व्हेस्टर शोधत होते पण कोणी पुढे यायला तयार नव्हते, बँका बुडाल्या सरकारने काही बँकांचे अधिग्रहण केले इन्व्हेस्टर च्या शोधात ती इमारत तशीच राहीली. पुढे २००१ साली सरकारने लिलाव करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मिळाले नाही, जसे मागील वर्षी भारतातील मोदी सरकारने डबघाईस आलेल्या मोठ्या बँकांना दुसऱ्या मोठ्या बॅंकांमद्धे अधिग्रहण केले आणि त्यांचा बोजा चांगल्या बँकांवर आला, आता पाहू किती दिवस त्या बँक बोजा सहन करतील,